Monday, November 24, 2008

भावनांचा खेळ

सहजचं
आयुष्यात खुप सोसलं ना की मग कोणत्या गोष्टीत रस वाटत नाही॥कशाचे अप्रुप वाटत नाही।जे आलयं ते जगायचं जे जातेय ते जाऊ द्यायचे..का होते असं ? मानवी मन हे विविध भावभावनाच्या हक्काचे ठीकाण.मग असं का होते..या भावनाच त्या माणसाला नकोशा होऊन तो भावनाहीन आयुष्य जगण्यातच सुख आहे असे का मानायला लागतो? सुख आणि दु:ख देणार्‍या अशा दोनच भावना असतात.त्यात सुखाच्या भावना मानवी मनाला आनंद देतात तर दु:खद भावना तडफडवितात.तुम्ही कसे जगता यावर खर तर तुमच्या सुख-दु:खाची गणित ठरतात असे मला वाटते.तुम्ही येणार्‍या प्रसंगाला कसे सामोरे जाता,त्याचा कसा सामना करता यावरुन तुमच्या भावनांची गोळाबेरीज करता येईल.मन हे चंचंल असते.त्या मनावर ताबा ठेवणे हाच उपाय भावनांवर आहे. आयुष्य जगतांना आपल्याला हवे ते मिळतचं असे नाही.कधी कधी जगतांना नको असलेल्या गोष्टी गोड मानुन जगावं लागते आणि एकदिवस ती नको असलेली गोष्टच आपली आवडती होऊन जाते.माणसाचे आयुष्य असेच आहे.माणुस हा प्राणी जगाच्या कोण्त्याही कोपर्‍यात जरी नेऊन ठेवला तरी तो कालांतराने त्या ठीकाणी रममाण होऊन आनंदात जगतांना दिसेल.आपल्या जवळची व्यक्ती मरण पावली तर त्याचा शोक काही दिवस करणारा माणुस पूर्ववत आपले जीवन हळूहळू जगायला लागतोच ना..!कारण माणुस हा परिस्थितीप्रमाणे जगणारा प्राणी आहे.आणि हीच मानवाची खरी ताकद आहे.आयुष्यात दु:ख असल्याशिवाय आपल्याला आनंदाचा आस्वाद घेता येत नसतो.जगायचं खुप खुप वेदना आयुष्याने दिल्या असल्यातरी आपल्या भावनांना पुलकीत ठेवायचे..उत्साही ठेवायचे..बघा मग आपल्याला दु:खातही आनंदाची प्रचिती येतेच...!!

No comments: