Thursday, October 16, 2008

लावणी

लावणी
कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलंय्‌ डौलात न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात
कसं लबाड खुदूखुदू हसतंय, कसं कसं बघतंय्‌ ह
आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याचं नादात
मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय्‌ गिरकी
किती इशारा केला तरी बी
आपल्याच तालात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात
कशी सुबक टंच बांधणी,
ही तरुण तनु देखणी कशी कामिना चुकून आली
ऐने महालात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात
लाल चुटुक डाळिंब फुटं,
मऊ व्हटाला पाणी सुटंही मदनाची नशा माईना
टपोर डोळ्यांत, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात


गीत -जगदीश खेबुडकर
संगीत-राम कदम
स्वर-उषा मंगेशकर
चित्रपट-सुशीला (१९७८)

o सुरेश भटांची कविता

जगत मी आलो असा
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
(रंग माझा वेगळा ह्या काव्यसंग्रहातून)

o सुरेश भटांची कविता

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!
विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्वपण
माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!
सहज कधी तू घरात लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!
जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीतमाझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंदवासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

Wednesday, October 15, 2008

नाट्यसंगीत

किती सांगुं तुला मज चैन नसे ॥हें दु:ख तरी मी साहुं कसें ।या समयिं मला नच कोणी पुसे ।हा विरह सखे मज भाजितसे ।मन कसें आवरूं ।किती धीर धरूं । कसे करूं ॥हे बंधु नव्हत मम वैरी खरे ।दावीती कसें वरि प्रेम बरें ।बोलोनी पाडीती हृदयासी घरे ।नको नको मला जिव ।विष तरि पाजिव ।सखे सोडिव ॥


गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर-बालगंधर्व
नाटक-संगीत सौभद्र (१८८२)
राग-आनंद भैरवी (मूळ संहिता)
ताल-धुमाळी

नाट्यसंगीत

किती सांगुं तुला मज चैन नसे ॥हें दु:ख तरी मी साहुं कसें ।या समयिं मला नच कोणी पुसे ।हा विरह सखे मज भाजितसे ।मन कसें आवरूं ।किती धीर धरूं । कसे करूं ॥हे बंधु नव्हत मम वैरी खरे ।दावीती कसें वरि प्रेम बरें ।बोलोनी पाडीती हृदयासी घरे ।नको नको मला जिव ।विष तरि पाजिव ।सखे सोडिव ॥


गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर-बालगंधर्व
नाटक-संगीत सौभद्र (१८८२)
राग-आनंद भैरवी (मूळ संहिता)
ताल-धुमाळी

नाट्य-संगीत

अर्जुन तर संन्यासि हो‍उनी रैवतकीं बसला ।झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनिं ठसला ।वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला ।तत्वनिष्ठ वेदान्ती हो‍उनि तुच्छ मानितो विषयाला ।प्राणायामें कुभंक करुनी साधित योगाला ।सुभद्रेची मूर्ती हृदयीं धरुनि करितसे ध्यानाला ।ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली ।कीं ढोंग नसुनि खरि वृत्ति यतिस साधली ।नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली ।भोळे अमुचे दादा तेथें जाति दर्शनाला ।तरी खचित सांगतो तयाच्या लागति नादाला ।


गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
नाटक-संगीत सौभद्र (१८८२)
चाल-शिवाज्ञेची वाट न पाहता’

नाट्य-संगीत

अरसिक किती हा शेला । त्या सुंदर तनुला सोडूनि आला ॥प्रेमें प्राणपतीला । मी संतोषें हा अर्पण केला ।दुर्मिळ जें स्थळ मजला । तें सहज मिळुनि या दुर्भाग्याला ।तेथुनि कां हा ढळला । त्या सत्संगतिला कैसा विटला ।कोंडुन ठेविन याला । मज दृष्टिस नलगे निष्ठुर मेला ॥


गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर -बालगंधर्व
नाटक-संगीत सौभद्र (१८८२)
चाल-अहा हे कृष्णा मुकुंदा

Monday, October 13, 2008

भाव - (रणजित देसाई याच्या 'आलेख' पुस्तकातील कथा)

भाव
डोंगरउतरणीवर ते पाच-पंचवीस झोपड्यांचं बेरड वस्तीचं गाव होतं।भल्या पहाटे लगमा उठली होती.तिचं सार अंग दुखत होतं.काल सारा दिवस तिने रानात काढला होता.पूर्वी तास दोन तास रानात फिरलं तर टोपलीभर चिन्न गावायची.काल सबंध दिवस फिरुन पोरांच्या तोंडात टाकायला पुरेशी चिन्न मिळाली नव्हती.कालपर्यंत कसेबसे दिवस ढकलले;पण आज काय? त्या विचाराबरोबर लगमाचा आळस कुठच्या कुठे गेला.गावातनं कोंबडे आरवत होते.झोपलेल्या आपल्या मुलांवरुन लगमाने नजर फिरवली आणि तिने चूल पेटविली.लगमानं भांड घेतलं आणि पाणी गरम करुन ती झोपडीमागे उभ्या केलेल्या खोपटात गेली.तिला पाहतच गाईनं हंबर केला.लगमाने शेणकाडी आवरली आणि धार काढून ती झोपडीत आली.पोरं अजुन झोपली होती.दूध चार वाट्या पाणी तरी भरेल की नाही,याची शंका होती.लगमानं त्यात दोन वाट्या पाणी मिसळलं आणि दूध तापत ठेवलं. लगमाचा नवरा कल्लू धान्य आणण्यासाठी दोन दिवसांमागेच घराबाहेर पडला होता.संध्याकाळी येतो म्हणून पैसे घेऊन गेलेला तिचा नवरा दोन दिवस झाले तरी परतला नव्हता.लगमा वाट पाहून थकली होती.गेले दोन दिवस होते ते मूठभर तांदूळ तिनं सकाळी पेज आणि रात्री भात म्हणून पुरविले होते...गावात सगळी घर ती फिरून आली होती.जे लगमाचं होतं तेचं गावाचं.खायला नव्हतं तर उसनं देणार कोण? लगमा चुलीत काडया सरकवीत विचार करीत होती.अचानक लगमानं तोंड फिरवलं.पाठीवर धाकटा यल्ला ओणवा झाला होता.थोरला सत्या अजून झोपलाच होता.यल्ला म्हणाला,'आये..भूक!खाया दे!' 'उटलं न्हाई तवर भूक! खा मला आनी मर!'लगमा बोलून गेली.दुसर्‍याच क्षणी दिवसांमागं शेजारच्या झोपडीत गमावलेलं पोर आठवलं.लगमा कळवळली.भ्यालेल्या यल्लाला तिनं जवळ घेतलं.यल्ला हसला.रडणार्‍या आईकडे तो पोहू लागला.पाठोपाठ थोरला सत्या उठला.तो चुपचाप आईजवळ येऊन बसला.लगमानं दुधाचं भांडं उतरलं.लगमा म्हणाली,'सत्या दूध पी आनी गाय घेऊन जा.''दुद!' सत्या म्हणाला,'आये आज कन्या न्हाईत?''ठेवल्यात तुज्या बानं!कुठं उलथलाय कुनास दखल!'सत्या काही बोलला नाही.खोल गेलेल्या डोळ्यानं त्यानं आपल्या आईकडे बघितलं आणि गप बसून राहिला.लगमानं दोन्ही पोरांना दूध दिलं.पोर बाहेर जाऊन आली. सत्या गाय सोडून घेऊन निघाला.त्याचा जीव घुटमळला.जाता जाता धीर करुन तो म्हणाला,'आये..आल्यावर खायला देशील?'सत्याकडे न बघता लगमा म्हणाली,'जा बघू! आल्यावर दीन खायला. शानं माझा सत्या!'सत्या गेला.यल्ला खेळायला गेला;पण आणखी थोडया वेळात ही पोरं कळवळून घरला येणार हे लगमाला माहीत होतं.रानात चिन्नं-पिरशी गोळा करायला जावं असा विचार तिच्या मनात आला.पण आजवर आलेल्या अनुभवानं तिनं तो विचार मागे टाकला.लगमा विचार करत होती.गाठीला पैसं असून खायला का मिळत नाही हे तिला कळत नव्हतं. रंगीकडे मागितलं तर पसाभर का होईना,नाचणं मिळायची शक्यता होती.पण तिच्याकडे जायची लाज वाटत होती.रंगी सार्‍या गावाला पुरुन उरलेली बाई.आजवर लई जोर तिचा.तिथं दारू खायची आणि घरात जाऊन बाईल बोलली की मारहाण करायची.अध्र्या रात्रीपर्यंत आरोड,हे नेहमीच झालं होत.दोन दिवसामागं लगमानं असचं कल्लूला छेडलं.कल्लूनं समोर दहा रुपयांची नोट टाकली आणि म्हणाला,'हे घे पैसं'चार पोरांस्नी!तालेवर तू!पैसं खात्यात?'कल्लू तसाच रागानं बाहेर गेला.सरळ रंगीच्या झोपडीत शिरलेला बघताच लगमाचं डोकं फिरलं.सरळ जाऊन तिनं रंगीच्या झिंज्या धरल्या.एकच गलका उसळला.रडारड झाली,आणि बर्‍याच वेळानं गावं शांत झालं.त्याच रंगीच्या दारात गेलं तर काय म्हणेल ती!लगमा उठली.सरळ ती रंगीच्या झोपडीकडे गेली.लगमाला पाहून रंगीचा विश्वास बसेना.लगमा म्हणाली,'आक्का!''काय?'पोरास्नी खाया कायबी न्हाई.उसनं आजच्यापुरत भात देशील?आज आलं की सवाईनं परत करीन.''झिंज्या उपटाय आली व्हतीस तवा लाज वाटली न्हाई?दारु खाणार तुझा घो आनी गाली खानार मी व्हय?लगमा तिथं थांबली नाही.रंगीनं टाकलेली पिंक न पाहताही लगमाला दिसली. मोकळ्या झोपडीत जाऊन ती गप्प बसून राहीली.भूकेनं आतडी तुटत होती.काय करावं सुचत नव्हतं.राहून राहून उरलेल्या दुधाकडं तिचं लक्ष जात व्हतं.तोच धाकटा रडतं आत आला.काही न बोलता लगमानं त्याला वाटीभर दूध दिलं.निश्चयानं ती उठली.घराची आवराआवर केली.धाकट्याला हाताशी धरुन ती शेजारी गेली.'मल्लवा!'मल्लवा दाराशी आली 'काय गं?''जरा पोरावर नजर ठेव.म्या वाडीवर जाऊन येतो.''कल्लू आला न्हाई?''न्हाई.''वाडीवर धान मिळतंया म्हनं.''कुनाकडं?''वान्याला सरकारनं दिलंय म्हनं वाटायला.''बघतू.''आये..मी येतो संगं.''जीव घीन!गुमान र्‍हा.खायला आनतो तुला.'लगमानं दटावलं.लगमानं उतरंडीत लपवून ठेवलेली नोट चोळीच्या दंडात खोवली आणि ती वाडीकडे चालू लागली.सारा शिवार श्रावणाच्या उनात चकाकत होता.महिनाभरात शिवारात हळवी भातं येणार होती.नाचणा काळाभोर दिसत होता...डेरेदार आंब्याच्या राईत वसलेली वाडी दिसू लागली.लगमाच्या गावाला बाजारचं तेच ठिकाण होतं.पिठाच्या गिरणीचा आवाज कानांवर येत होता.लगमा वाडीत गेली तेव्हा भरदुपार झाली होती.वाडी फार तर हजार दीड हजार वस्त्तीचं गावं.सोमवारी बाजार.त्या दिवशी पंचक्रोशीतल्या छोट्या खेडयांची माणसं तिथं बाजाराला गोळा व्हायची.एरव्ही गाव कसं शांत असायचं.लगमा वाडीतून चालत होती। दोन प्रहरी दुकानाची एक फळी उघडी ठेऊन दुकाने उघडी होती।रस्त्यावर कुत्रंदेखील दिसत नव्हतं.लगमा वाण्याच्या दुकानावर गेली. दुकानात वाण्याचा थोरला पोरगा आप्पा होता।दुकानाच्या दोन फळ्या उघड्या होत्या.आप्पाने बसल्या जागेवरुन लजमावर नजर फेकली.लजमा दोन पोरांची आई होऊनही उफाडयाची दिसत होती.सावळा रंग असुनही तिची भरदारा अंगलट लपत नव्हती.आप्पानं विचारलं,'काय पायजे?''सावकार!दाणं मिळत्यात म्हणून समजलं'आप्पा हसला.आपली नजर लगमावर रोखत म्हणाला,'मिळतंय की.पण कारड काढलंस?'कसलं?''मग झालं?तुला कसं मिळनार?सरकारी बाब ही!''असं म्हनू नकासा धनी!अडचणीला कवाबी काम सांगा.करीन मी.''खरं!'आप्पानं विचारलं.'खोटं सांगत न्हाई मी.लगमा आशेनं म्हणाली.'तू माझ्या नडीला पावलीस तर देतो की दाणं!चांगलं भात आहे.''कसली नड?''आता फळया लावून घेतो.उगीच कोन याय नको.मागच्या दारानं ये.'आप्पा निर्लज्जपणे म्हणाला. लगमाचा संताप उफाळला.आप्पानं एक फळी लावली होती.लगमा उफाळली,'तुझी आई..''चूप!'आप्पा खेकसला,ज्यादा बोलायचं काम न्हाई.पटत नसलं तर निघून जा.पटलं;मागच्या दारानं ये.'दुकनाची उरली फळीही बंद झाली.रस्ता उन्हात तापत होता;पण हवेतला गारवा संपत नव्हता.लगता बंद फळीकडे बघत होती.डोळयांत पाणी उभं होतं...
गिरणीत सडून घेतलेले तांदूळ घेऊन लगमा संध्याकाळी गावची वाट चालत होती.गावात झोपडीसमोर थोरला बसला होता.आईला पाहून तो आनंदला.आईच्या डोक्यावरचं गठळं निरखीत तो म्हणाला,'भात मिळालं?''व्हय लेका!पन धाकला कुठं हाय?''आत झोपलाय.लई रडला.भूक लागलीया बघ.'लगमा आत गेली.गडबडीने तिनं चूल पेटवली.तांदूळ धुतले आणि तिने ते चुलीवर चढविले.भात शिजत होता.धाकटा उठला.तो आईला बिलगला.रात्री दूध-भात पोटभर खाऊन पोरं झोपली.दोन्ही पोरांच्यामध्ये लगमा सताड उघडया डोळयांनी जागी होती.राहून राहून डोळयातून अश्रू येत होते. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे लगमा उठली.तिने पेज तयार केली.धार काढली.पोरांना पेज देऊन पिटाळलं.थोडे तांदूळ काढून तिने जाते मांडले.भाकरीसाठी ती तांदळाचं पीठ दळू लागली.जात्याची घरघर चालू असता झोपडीत कल्लू आला.लगमाचं जातं थांबलं.कल्लूच्या पाठीला ओझं होतं.कल्लू म्हणाला,'घे!नाचणं हाईत.भात हाय.सुगीपातूर काळजी न्हाई.''काल का आला न्हाईसा?''काल?अगं,मिळाय नको?दहा कोसांवर मामाचं गाव.दिवस रात तेच्या संगं वाक बडवला तवा पैसं देऊन हे मिळालं.काय दळत न्हतीस?''तांदूळ!''कुठं मिळालं?''वाडीला.''काय भाव!''भाव?'लगमानं दचकून नवर्‍याकडे पाहिलं.तिचे डोळे भरले.हसून ती म्हणाली,'लई पैसं घेतलं.''मिळालं हेच थोर.'कल्लू म्हणाला.'आग लागली त्या तांदळाला.'म्हणत लगमा उठली.तिने काल आणलेल्या तांदळाचं गठलं उचललं आणि संतापानं ती झोपडीबाहेर गेली.दारात उभी राहून ती ओरडली,'गी...गी...गी..'सार्‍या झोपडयांच्या कोंबडया कलकलत समोरच्या आल्या.लगमाने गठळयातले तांदूळ फेकायला सुरुवात केली.कोंबडया तांदळावर तुटून पडत होत्या.दाराशी आलेला कल्लू थक्क झाला.तो भानावर येऊन थांबला.लगमाच्या हातून गटलं हिसकावून घ्यायचा तो प्रयत्न करीत होता.लगमा त्याच्याशी झोंबत होती.चावत होती.कल्लूनं उरलं गठलं हिसकावून घेतलं.लगमाला लाथ मारली.लगमा पडली.कोंबडया भिऊन कलकलल्या.
धरणीवर पडलेली लगमा मुक्त कंठानं रडत होती....

मायमराठी