Monday, November 24, 2008

अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती


'हॅरी पॅटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे।के।रोलिंग यांनी जगविख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात 'अपयशाच्या'फायद्यावर प्रकाशझोत टाकुन विद्यार्थ्यांना एक नवा कानमंत्र दिला॥हा कानमंत्र प्रत्येकासाठी बहुमोल ठरणारा आहे।म्हणून तुम्हा सर्वांसाठी त्या भाषणाचे थोडक्यात ठळक मुद्दे देत आहे।पदवी घेतल्यानंतर लेखिकेचे सात वर्षे ही महाप्रचंड अपयशाची होती॥त्याबाबत सांगतांना त्या म्हणाल्या-
*अपयश म्हणजे अनावश्यक गोष्टी बाजूला सारणे।मी जी काही आहे त्यापेक्षा वेगळी कोणी आहे,असा आव आणायचे मी थांबवले आणि मग मी माझी शक्ती ज्या कामाचे मला महत्व वाटत होते त्या कामामध्ये ओतायला सुरवात केली।तुम्हाला बसलेल्या फटक्यांमधून तुम्ही अधिक शहाणे,अधिक कणखर होऊन उभे राहता,हे समजणे महत्वाचे आहे।त्यामुळे तुम्ही तुमच्या तगून राहण्याच्या क्षमतेवर विसंबून राहू शकता।तुम्ही प्रतिकुलतेचा सामना जोवर करत नाही तोवर तुम्ही स्वत:ला ओळखु शकत नाही आणि तुमच्या नातेसंबंधांची ताकदही पणाला लागत नाही.मी जेवढ्या प्रमाणात अपयशी ठरले तेवढे तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाही।पण कुठेतरी अपयश घेतल्याखेरीज जगणे अशक्य आहे।तुम्ही सावधपणेच जगायचे ठरवले-अपयश येऊच नये,याचा आटोकाट प्रयत्न करत राहिलात,तर ते जगणे म्हणजे अपयशीच होणे।परीक्षांमध्ये पास होऊनही जी आंतरिक सुरक्षितता मला मिळाली नव्हती ती मला अपयशातुन मिळाली.*आयुष्य अवघड असते आणि गुंतागुंतीचे असते,शिवाय ते कोणालाच पूर्णपणे ताब्यात ठेवता येत नाही,हे समजण्याइतकी नम्रता तुमच्याजवळ असली तरी तुम्हाला आयुष्याच्या प्रवाहात तरता येईल.*या ग्रहावरच्या इतर कोण्त्याही प्राण्याकडे नाही अशी क्षमता आहे.माणूस प्रत्यक्ष अनुभव न घेताही शिकू शकतो.दुसर्‍या माणसाच्या मनात शिरुन त्याला विचार करता येतो;दुसर्‍या जागी स्वत्:ला कल्पिता येते. अर्थातच ही एक शक्ती आहे.माझ्या कल्पित कथांच्या जादुई मुद्रेसारखी;नैतिकद्रुष्ट्या तटस्थ असलेली.अशी शक्ती तुम्ही जग समजून घेण्यासाठी,सहानुभूतीसाठी वापरु शकता,तशीच ती परिस्थिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी किंवा आपल्याला हवी तशी वाकवून घेण्यासाठीही वापरु शकता.*जग बदलण्यासाठी आपल्याकडे जादूची कांडी असावी लागत नाही.आपल्याला आवश्यक असणारी ताकद आपल्या आत असतेच.आपल्याजवळ असते ती अधिक चांगली कल्पना करु शकण्याची ताकद
* जशी कथा असते तसेच जीवन असते।तिथे लांबी महत्वाची नसते,तर ते किती चांगले आहे हे महत्वाचे असते .

2 comments:

विनायक पंडित said...

खूपच छान माहिती आहे.जे के रोअलिंगयांचे हे भाषण संपूर्णपणे कुठे वाचायला मिळेल का?

aasha said...

धन्यवाद..५ जुलै २००८ च्या साप्ताहिक सकाळ मध्ये जे.के.रोलिंग यांचे पूर्ण भाषण आहे.