Friday, November 21, 2008

तो..

आज रस्त्याने जातांना त्याची न माझी जिथे पहीले भेट झाली ते ठीकाण नकळत वाटेत लागले अन मनात चर्रर्र झालं.इंग्रजीचा क्लास लावायचा म्हणून भेट झाली अन ती भेट आयुष्यात नवचैतन्य घेऊन आली.आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी आपल्या हक्काचं आपलं माणूस आहे,ही कल्पनाच किती मनाला सुखावुन टाकणारी असते ना..मी प्रेमात पडले मग आमच्या भेटी-गाठी,मनसोक्त फिरणे,बागडणे,धुंद पावसाच्या सरीत दोघांचे चिंब भिजणे,मस्त खडकवासला येथे गरम-गरम भज्यांवर ताव मारुन भविष्याच्या स्वप्नात दंग होऊन जाणे..कधी भांडण तर कधी रुसवा-फुगवी..अथात यात माझा सहभाग प्राधान्याने असायचा..मग तो मला जेव्हा लडिवाळपणे समजुन सांगायचा..माझी मनधरणी करायचा तेव्हा माझ्या अंगावर मुठभर मास चढायचं..!!तेव्हा तो म्हणायचा मी तुला समजुन घेतो..तुझ्यावर खुपखुप प्रेम करतो म्हणुन तु मला इमोन्शली ब्लकमेल करते..मी दुर गेलो की समजेल तुला माझी किंमत..!! मी त्याच्या या बोलण्याकडे दूलक्ष करीत फक्त हसायचे..तु काय जाणार मला सोडून म्हणून मी पण त्याची गंमत करायची.तेव्हा तो गालातल्या गालात स्मित करित म्हणायचा बघ हं खरचं जाईल..त्याचे ते शब्द मला पायाखालुन जमीन सरकल्यासारखे वाटले..अन मी रडायला लागलाच मला जवळ घेऊन अग राणी..गंमतीने म्हटलं तुला अन तु वेड्यासारखी रडायलाच लागली.तु माझा श्वास आहे..श्वास कधी शरीरापासुन वेगळा राहू शकेल काय..!काही झालं तरी तुला अन मला कोणी दुर करु शकणार नाही.अगदी तो परमेश्वरसुध्दा नाही.त्याच्या या बोलण्याने धिरावलेली मी त्यावेळी नकळत त्याच्या कुशीत स्वत:ला झोकुन द्यायची..प्रेम आहे शेवटी..प्रेमाची ऊब स्वर्ग आनंद देऊन जातो.मलाही तोच आनंद त्याच्या सहवासात मिळायचा..पण दैव कुणी जाणले..ज्याचेसाठी आपले सर्वस्व मी वाहीले तो माझा प्रियकर आज त्याच्या पत्नीसोबत सुखाचा संसार करतो आहे..त्या सर्व शपथा,ती सर्व वचने,ते सर्व क्षण जे आम्ही सोबत घालविले ते सगळे विसरुन.....दुसरीची ओंजळी भरुन माझी ओंजळी रिती ठेवली...त्याने ज्याला मी माझं सर्व मानले.
विरह शब्दात कसे सांगु,
शब्दच झाले मुके
तुझ्याविन जीवनाचे,
रंग झाले फिके।
ह्रदयात साठल्या,
आठवणी कोवळ्या
अश्रूत वाहील्या,
प्रितीच्या पाकळ्या
ह्रदयात सागर हा,
शांत जरी बसतो
वेदनांच्या लाटेसंगे,
अंतरी घुसमुटतो.

No comments: