Friday, November 21, 2008

मंगेश पाडगावकर



कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे

डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे


बहर धुंद वेलीवर यावा

हळुच लाजरा पक्षी गावा

आणि अचानक गळुन पडावी विखरुन सगळी पाने

भान विसरुनी मिठी जुळावी

पहाट कधि झाली न कळावी

भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे


हळुच फुलाच्या बिलगुनि गाली

नाजुक गाणी कुणी गायिली

आता उरली आर्त विराणी सूरच केविलावाने

जुळली हृदये, सूरहि जुळले

तुझे नि माझे गीत तरळले

व्याकुळ डोळे कातरवेळ स्मरुन आता जाणे


गीत-
मंगेश पाडगावकर
संगीत-यशवंत देव
स्वर-सुधीर फडके
राग-मिश्र किरवाणी (नादवेध)


No comments: